'साहित्यप्रेमी'तर्फे ओरोसला 'आषाढसरी' कविसंमेलन

Edited by:
Published on: June 25, 2025 16:11 PM
views 90  views

सिंधुदुर्गनगरी : 'आम्ही साहित्यप्रेमी'च्यावतीने गुरुवारी २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता आषाढ मासारंभ आणि महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधुन 'आषाढसरी' कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी, 'आवानओल प्रतिष्ठान'चे अध्यक्ष श्री. अजय कांडर उपस्थित राहणार आहेत. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.

'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'प्रणित 'आम्ही साहित्यप्रेमी' या साहित्यिक व्यासपीठाचा हा पाचवा मासिक कार्यक्रम आहे. कविकुलगुरु कालिदास दिनाचे औचित्य साधुन होत आहे. हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. कवी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.