
सावंतवाडी : गणेशोत्सवातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्त श्री नरसोबा मंदिर, जुनाबाजार येथील भाविकांनी सहस्र मोदकांचा नैवेद्य श्री चरणी अर्पण केला. सावंतवाडी जुनाबाजार येथील श्री नरसोबा मंदिर मध्ये १७ दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक, भाजनादी कार्यक्रमनी पार पडली. संकष्टी चतुर्थी निमित्त संध्याकाळी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले होते. यावेळी महिला वर्गाने मोठी उपस्थिती दर्शविली होती. जुनाबाजारातील भाविकांनी संकष्टी चतुर्थीच्या निमित्त सहस्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करून महा आरती करण्यात आली. बाप्पा चरणी ठेवलेले मोदक सर्वांना प्रसाद म्हणून देण्यात आले. १७ दिवस श्रीची मनोभावे पूजा केल्या नंतर सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी भव्यदिव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून या मंडळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाला विसर्जन स्थळी फुलांनी सजवलेल्या पालखीतून नेण्यात येते. यावेळी महिला ढोल पथक खास आकर्षण असणार आहे. या विसर्जन सोहळ्याचा गणेशभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन उत्सव कमिटी तर्फे करण्यात आले आहे.