
सावंतवाडी : सालईवाडा येथील रहिवासी आणि साधना टेलरिंग क्लासेसच्या संस्थापिका श्रीमती साधना सुभाष गांवस (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांनी आज पहाटे सालईवाडा येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
श्रीमती साधना गांवस या स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती चिटणीस यांच्या कन्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू आणि नात असा परिवार आहे. त्या लक्ष्मण उर्फ संतोष गांवस यांच्या मातोश्री तर पत्रकार विनायक गांवस यांच्या आजी होत.
आज शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.