
वैभववाडी: वैभववाडी तालुक्यातील खोरकर (अरुळेकर) रावराणे मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद द. रावराणे तर सचिव संतोष सि.रावराणे यांची बिनविरोध निवड झाली.मुंबई येथे रविवार १२ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.या बैठकीत पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
वैभववाडी तालुक्यातील मुंबई व ग्रामीण भागातील ग्रामस्थांच रावराणे समाजाचं खोरकर रावराणे समाज मंडळ आहे.या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणीक क्षेत्रात काम केलं जातं. या मंडळाची वार्षिक सभा मुलुंड (पूर्व )येथील संभाजी राजे सभागृहात रविवारी पार पडल.यावेळी सन २०२५ ते २०२८या तीन वर्षासाठी २५जणांची कार्यकारिणीची निवडण्यात आली. यावेळी अनेकांनी मावळते अध्यक्ष गणपत रावराणे यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या कार्याचा गौरव केला.त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.निवडीनंतर नुतन अध्यक्ष सदानंद रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी ते म्हणाले,समाजाने जो विश्वास दाखवला तो सार्थकी लावेन.तसेच समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांच्या साथीने प्रामाणिकपणे काम करेन असा विश्वास व्यक्त केला.
रावराणे मंडळाची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष:सदानंद द.रावराणे,सचिव संतोष सि.रावराणे, कार्याध्यक्ष प्रभानंद रावराणे,उपाध्यक्ष शैलेंद्र रावराणे व सुबोध रावराणे,खजिनदार राकेश रावराणे,सह चिटणीस सत्यवान बा.रावराणे व सतीश शां.रावराणे,सदस्य:
अर्जुन बा.रावराणे,ज्ञानेश्वर त्रिं. रावराणे,सुरेश वि. रावराणे, विजय बा. रावराणे, प्रताप बा. रावराणे, विक्रम दु. रावराणे, मिलिंद वि. रावराणे, महेश र. रावराणे , महेश प्र. रावराणे,प्रभाकर ग. रावराणे , सागर अ.रावराणे,संजय पा. रावराणे, उदय वि.रावराणे,विनायक स. रावराणे,उदयसिंह मा. रावराणे,किशोर सु. रावराणे ,नागेश र. रावराणे यांची निवड करण्यात आली आहे.