स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सचिन हुंदळेकर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 13, 2024 05:57 AM
views 258  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा पोलिस दलाचे आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे मुख्य अंग असलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण  शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार  सचिन हुंदळेकर यांचेकडे सोपविण्यात आला  आहे. यापूर्वी त्यांनी कुडाळ सावंतवाडी  पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक  व सागरी सुरक्षा विभागात यापूर्वी काम केले होते. सध्या त्यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेचा कार्यभार आहे.

जिल्हा पोलीस दलात  कार्यतत्पर पोलीस अधिकारी म्हणून  त्यांची ख्याती आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी या जिल्ह्यात पोलीस अधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी गेल्या वर्षभर  चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार आधी सर्वांमध्ये चांगला समन्वय ठेवून त्यांनी या जिल्ह्यात  विविध पदावर काम केले आहे. 

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत खोपडे  यांनी कार्यभार पाहिला होता. त्यांची आता जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी बदली झाली आहे. व स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी सचिन हुंदळेकर यांच्याकडे  या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल  यांनी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगला वापर पोलीस दलाची शान  आणखी उंचावण्यासाठी केला आहे.