परुळेत सचिन देसाई संपर्क कार्यालय जनतेच्या सेवेत

Edited by: दिपेश परब
Published on: May 23, 2024 13:47 PM
views 167  views

वेंगुर्ला : शिवसेना उपजिल्हाप्रमुख व म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते सचिन देसाई यांनी परुळेबाजार येथे सचिन देसाई संपर्क कार्यालय स्थापन करून त्याचा शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ केला आहे.

राज्य शासन व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती तसेच विविध योजना, विविध नवीन विकासकामे नागरिकांपर्यंत पोचवीत. तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी हे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते सचिन देसाई यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी भोगवे माजी सरपंच महेश सामंत, उपसरपंच रूपेश मुड्ये, विजय घोलेकर, विभाग प्रमुख देवदत्त साळगांवकर, अभय परूळेकर,चंदन माड्ये, मयुरेश वाडयेकर, उमेश मडवळ, प्रविण परब आदी उपस्थित होते.