
दोडामार्ग : दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यातील दिव्यांग आणि निराधार यांना अंत्योदय रेशनकार्डचा लाभ मिळावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे साईकृपा दिव्यांग आणि निराधार समिती दोडामार्गचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी केली.
सावंत म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणाऱ्या कुटूंबाना रेशन धान्य दुकानावर मुबलक धान्य मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. काही जणांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळतो. मात्र आवश्यक इष्टांक उपलब्ध नसल्याने बरेच लाभार्थी वंचित राहतात. यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यामुळे श्री. सावंत यांनी समाधान व्यक्त केले आहे.