मांजराच्या ओरडण्याने सावध झाले ; अडगळीतील घोणस पाहून घाबरले

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 16, 2026 12:15 PM
views 297  views

कणकवली : कणकवली शहरात फौजदारवाडी येथे रविवारी दुपारच्या सुमारास नवनीत बागवे यांच्या घराशेजारी विषारी आग्या घोणस साप अडगळीच्या ठिकाणी बसला होता. मांजर जोरजोराने ओरडू लागले. त्यावेळी घरातील व्यक्तींच्या हा विषारी साप निदर्शनास आला. सर्पमित्र अवधूत पाटील व दत्तू मेस्त्री यांनी ४ फुटी विषारी आग्या घोणस (Russell’s Viper) साप सुरक्षितरीत्या पकडला. हा साप रहिवासी भागात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

माहिती मिळताच सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापाला कोणतीही इजा न होता पकडले. त्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता त्वरित सर्पमित्र किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.