
सावंतवाडी : सुज्ञ नागरिक म्हणून गेळेवासियांनी घेतलेल्या उचलीबद्दल त्यांचे अभिनंदन, आमचा त्यांना पाठिंबा आहे. कावळेसादवर कोणाचातरी डोळा आहे असं मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलं होतं. त्यामुळे जमिन लाटणारी मंडळी कोण ? हे केसरकरांनी जाहीर करावं. तसेच तिलारीच कॉट्रॅक्ट घ्यायला बॉडीगार्ड कोण वापरतात ? त्यांची नावं दीपक केसरकरांनी जाहीर करावी. जबाबदार मंत्री असताना नाव घ्यायला घाबरू नयेत असा टोला उबाठा शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला आहे.
ते म्हणाले, सुज्ञ नागरिक म्हणून गेळेवासियांनी घेतलेल्या उचलीबद्दल त्यांच अभिनंदन, आमचा त्यांना पाठिंबा आहे. गेळेच आंदोलन हे पेढे वाटून ढोल वाजवणाऱ्या दीपक केसरकर व भाजपला ही चपराक आहे. निवडणूक आली की या प्रश्नांची आठवण नेत्यांना होते. दीपक केसरकर व भाजपच्या नेत्यांत हिंमत असेल तर कबुलायतदार प्रश्न सोडवून दाखवावा असं आव्हान श्री. राऊळ यांनी दिले. नुसत्या बाता मारू नयेत असं ते म्हणाले.
दरम्यान, जमिन लाटणारी मंडळी कोण ? हे केसरकरांनी जाहीर करावं. कोणाचा डोळा कावळेसादवर आहे ते त्यांनी जाहीर करावं. कॉट्रॅक्ट घ्यायला बॉडीगार्ड कोण वापरतात यांची नावं दीपक केसरकरांनी जाहीर करावी. जबाबदार मंत्री असताना नाव घ्यायला घाबरू नये असा टोला हाणला. तर जनतेच्या भल्यासाठी आणलेला एकतरी प्रकल्प केसरकरांनी दाखवावा. इथल्या किती लोकांना रोजगार दिला हे त्यांनी सांगावं. केवळ आश्वासनापलिकडे ते काही करू शकले नाहीत.भाजप आणि केसरकरांनी लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण होताना दिसत नाहीत. गेळेप्रमाणेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांनी धारिष्ट्य दाखवाव, फसवेगिरीला आता बळी पडू नये असं मत व्यक्त केले.
दरम्यान, तुमच्या निष्क्रियतेच खापर उद्धव ठाकरेंवर किती दिवस फोडणार ? अडीच वर्षांत तुमच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठल्यानंतर प्रश्न का सोडवू शकला नाहीत ? हे दीपक केसरकर यांनी स्पष्ट करावं. भाजप आणि केसरकर सत्तेवर आहेत. त्यांनी हा प्रश्न सोडवून दाखवावा. ग्रामस्थांना हक्काचा जागा मिळत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. किती दिवस भिजत घोंगडे ठेवणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार,उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, शिवदत्त घोगळे, संतोष पाताडे, वासुदेव होडावडेकर आदी उपस्थित होते.
कॉग्रेसला शुभेच्छा...!
पक्षाकडे उमेदवारी मागायचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. कॉग्रेसला आमच्या शुभेच्छा आहेत. महाविकास आघाडीत ज्यांची ताकद असेल जो उमेदवार योग्य वाटेल त्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याच महाविकास आघाडी काम करणार असल्याचे रूपेश राऊळ यांनी सांगितले.