
वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर या १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता वेंगुर्ला तालुक्याला भेट देणार आहेत. यानिमित्त बॅरिस्टर नाथ पै समुदाय हॉल कॅम्प येथे तालुक्यातील महिलां महिलांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी तालुक्यातील ज्या महिलांना, महिला विषयक समस्या मांडायच्या असतील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब यांनी केले आहे.