बांबोळीत आरोग्‍यमंत्री विश्‍वजित राणेंचा रूद्रावतार

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 07, 2025 16:14 PM
views 338  views

बांबोळी - गोवा :  गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज शनिवारी (७ जून) गोवा मेडिकल कॉलेजला अचानक भेट देऊन रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्धल माहिती घेतली. त्यांच्या या भेटीदरम्यान कॅज्युल्टी विभागातील डॉक्टर रुद्रेश यांच्या उद्धट वर्तनाबद्दल तत्काळ निलंबनाचा आदेश देण्यात आला आहे.

आरोग्यमंत्र्यांनी GMC ला भेट देत कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्धल माहिती घेतली. या वेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत कर्मचाऱ्यांना सांगितलं की, "रुग्णांशी नीट बोला आणि व्यवस्थित वागा, अन्यथा घरी चला."

GMCच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रुद्रेश यांच्या उद्धट आणि असभ्य वर्तनाविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबतच्या चौकशीनंतरच आरोग्यमंत्र्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं समजतं. याआधी (२४ मे) आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघड झाल्याचे जाहीर केले होते. याआधी आरोग्य विभागातील ६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. यात २ आरोग्य निरीक्षक आणि ४ स्वच्छता निरीक्षकांचा समावेश होता.