
सावंतवाडी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्क्रीप्ट देत अन् मंत्री नितेश राणे बोलतात. कॉग्रेसमध्ये असताना ते काय बोलत होते हे त्यांनी आठवावे. सिंधुदुर्गात लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे झटका आणि फटका विषय इथे आणू नयेत. इंग्रजी मिडियमला नितेश राणे शिकल्यानं त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास नव्हता. तो आम्हाला शिकवला गेला आहे. त्यामुळे इतिहास समजून घ्यावा, विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राणेंनी करू नये असा हल्लाबोल माजी आमदार, उबाठा शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, एवढाच मुस्लिम द्वेष करत अहात तर पक्षप्रवेश का घेतात ? अनेक मुस्लिम बांधवांचे प्रवेश भाजपात का करत आहात ? असा सवाल श्री. उपरकर यांनी केला. तसेच नितेश राणेंच्या मंत्रीपदाची शिफारस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केल्यान ते स्क्रीप्टप्रमाणे विधान करत आहेत. वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न, लोकांच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष द्यावा असं मत व्यक्त केले.
दरम्यान, राणे किती कृतज्ञ आहेत ते यावरून दिसत. वडिलांना निवडून आणण्यासाठी राज ठाकरेंची सभा लावायची आणि आता त्यांच्यावरच टिका करायची ही त्यांची सवय आहे. थोड्यादिवसांनी भाजप नेत्यांवर ही ते बोलतील असा टोला हाणला. शिवरायांनी त्यांच्या राज्यात सर्वधर्मीयांना समान न्याय दिला. शिवरायांबद्दल अभ्यास करूनच मत व्यक्त करावे. बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेला इतिहास वाचलेला नसेल, तर तो वाचावा. तसेच, अधिक माहिती हवी असल्यास माझ्याकडून घ्यावी असा टोला देखील उपरकर यांनी मंत्री नितेश राणे यांना लगावला. यावेळी शिवसैनिक शब्बीर मणियार, आशिष सुभेदार आदी मान्यवर उपस्थित होते.