
दोडामार्ग : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हे भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील आरपीआय आठवले गट जोमाने प्रचार करत आहे. आणि महायुतीचाच विजय होणार असा त्यांनी विश्वासही व्यक्त केला आहे. महायुतीचे उमेदवार दीपक केसकरकर हे निवडून येण्यासाठी भाजप, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादीचे पादाधिकारी कार्यकर्ते गाव टू गाव जाऊन प्रचार करत आहेत. दोडामार्ग आरपीआय आठवले गट तालुक्यात मिठ्या उत्साहात केसरकर यांचा प्रचार करताना दिसत आहे.
राज्य सरचिटणीस रमाकांत जाधव, सखाराम जाधव, रामदास कांबळे, नगरसेविका जाधव पदाधिकाऱऱ्यांच्या मार्गदर्शना खाली सर्व कार्यकर्ते दीपक केसकर यांचा प्रचार करत आहेत. आणि दोडामार्ग तालुक्यातून मोठ्या मताधिक्याने दीपक केसकर निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.