
सावंतवाडी : राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कलाशिक्षक श्री.गावीत यांना राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त झाला. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धा सन २०२५ या स्पर्धेत अक्षरांच्या शिस्तबद्ध रचनेतून साकारलेले विचारांचे प्रभावी दर्शन आणि फलकावरील प्रत्येक शब्दांतून झळकलेली सौंदर्यपूर्ण सर्जनशीलता यामुळे आमच्या राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु कॉलेज सावंतवाडी प्रशालेचे कलाशिक्षक योगेश गावीत राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्रदान करुन गौरवण्यात येत आले.
या यशस्वितेसाठी, प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल कलाशिक्षक श्री. गावीत यांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, प्र.मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर , उपमुख्याध्यापक एस . एन पाटील , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक , तसेच पालक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी , पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.