RPD कॉलेजचा यशराज कंग्राळकर GS तर गायत्री गव्हाणे लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह..!

Edited by:
Published on: July 19, 2023 16:02 PM
views 185  views

सावंतवाडी : राणी पर्वतीची जुनियर कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी रिप्रेझेंटेटिव्ह यांची निवड करण्यात आली. कुमार यशराज कंग्रांळकर याची जनरल सेक्रेटरी म्हणून एक मताने निवड झाली तर कुमारी गायत्री गव्हाणे यांची लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवड झाली.

यावेळी कॉलेजमध्ये वर्षभर विविध सहशालेय जे उपक्रम होतात त्याचे नियोजन करणे व प्रत्यक्ष उपक्रम राबविण्यासाठी वेगवेगळ्या समित्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक कमिटी त्याचे प्रमुख कुमारी कश्मिरा ठाकूर प्रमुख व सदस्य, क्रीडा समिती प्रमुख कुमार .लवू सावंत व सदस्य भित्तीपत्रक समिती प्रमुख कुमारी प्रीती बाईत प्रसिद्धी समिती प्रमुख कुमारी खुशी रेडकर व सदस्य शिस्तपालन समिती प्रमुख कुमार यज्ञेश राऊळ व सदस्य यांची निवड करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक मॅडम, सांस्कृतिक प्रमुख प्रा.माया नाईक मॅडम, प्राध्यापक व्ही एस सावंत मॅडम, प्रा सांगळे सर प्रा.डिसिल्वा सर व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी निवडणुकीची प्रक्रिया प्राध्यापक सांगळे सर प्रा. डिसिल्वा सर ,प्रा मिलिंद कासार सर यांनी खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.