
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) २०२२ मध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी प्रशालेची तन्वी प्रसाद दळवी हिने २६६ गुणांसह जिल्ह्यात तिसरा तर तालुक्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकाविला आहे.
तसेच मानस महेश कुडतरकर २१८ गुणांसह जिल्ह्यात ३१ वा तर अस्मि प्रवीण मांजरेकर २०२ गुणांसह जिल्ह्यात ४९ वा क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे इ. ८ वी मध्ये मंथन तुकाराम गवस १६६ गुणांसह जिल्ह्यात ४८ वा क्रमांकाचा मान पटकावला आहे.
आरपीडी प्रशालेत सन २०२२-२३ साठी प्रवेश घेतलेल्यांपैकी सोहम कोरगावकर (२५८ गुण) जिल्ह्यात १० वा, तालुक्यात ५ वा व श्रीपाद संजय नाईक (२२२ गुण) जिल्ह्यात ७० वा तालुक्यात २३ वा असे यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले. तर श्रेयस केनवडेकर एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र तर ३ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. सदर गुणवत्ता यादीत श्रेयस श्रीपाद केनवडेकर याची निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवर एनएमएमएस परीक्षा शिष्यवृत्तीच्या धर्तीवर सारथी शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२२ पासून लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे. या सारथी शिष्यवृत्तीसाठी प्रशालेचे तीन विद्यार्थी पूनम गंगाराम नाईक, कुशाली नामदेव गुरव आणि शिवप्रसाद सुभाष गवस हे पात्र ठरले आहेत.
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेसाठी सोहम कोरगावकर, तन्वी दळवी यांची निवड
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती या हेतूने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांचेकडून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित केली जाते. सन २०२२-२३ यावर्षीच्या स्पर्धेसाठी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या ६ वीच्या एकूण ६ आणि ९ वीच्या एकूण २ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एकूण ४ विद्यार्थी प्रमाणपत्रसाठी पात्र ठरले तसेच विशेष म्हणजे सोहम बापूशेठ कोरगावकर (इ. ६ वी ) हा विद्यार्थी ६१ गुण प्राप्त करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला तसेच तन्वी प्रसाद दळवी (इ. ६ वी ) ५८ गुण प्राप्त करून द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली व या दोघांचीही निवड पुणे येथे होणा-या पुढील प्रात्याक्षिक परीक्षेसाठी झाली आहे.
सर्व शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना सौ. मुग्धा दिनेश नागवेकर पुरस्कृत कै. पार्वती महादेव धारगळकर स्मरणार्थ पारितोषिके देऊन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी या संस्थेकडून गौरवण्यात आले.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक, पर्यवेक्षक ए. व्ही. साळगांवकर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.