SSC RESULT 2023 ; RPD चा निकाल 99.26 टक्के

Edited by: विनायक गावस
Published on: June 02, 2023 17:24 PM
views 124  views

सावंतवाडी : राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीचा इयत्ता दहावीचा निकाल ९९.२६ % लागला असून तालुक्यामध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखलेली आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूल मधून एकूण १३६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते आणि १३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

प्रशालेतून कु.पारस प्रसाद दळवी हा ९६.८० % ( ४८४ गुण ) मिळवून प्रथम , कु. वैष्णवी पुनाजी धुमक ९६.६० % ( ४८३ गुण ) मिळवून द्वितीय व कु. लता महेश परब हिने ९६.४० % ( ४८२ गुण ) मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. याचबरोबर कु. हिमानी श्रीराम धोंड ९३.८० % , कु. सत्यम महेश पेडणेकर ९२.००% , कु. यशस्वी तुषार राऊळ ९१.८० % असे घवघवीत यश मिळवले आहे. तसेच कु.पारस प्रसाद दळवी , कु. वैष्णवी पुनाजी धुमक व कु. लता महेश परब यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष संपादणूक प्राप्त केली आहे. विशेष प्राविण्यासह ४५ विद्यार्थी , प्रथम श्रेणीत ६३ विद्यार्थी , द्वितीय श्रेणीत २५ विद्यार्थी , तृतीय श्रेणीत ०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकासभाई सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. नाईक, पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. साळगांवकर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक तसेच शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.