R.P.D. प्रशालेच्या 12 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा संस्थेमार्फत गुणगौरव

Edited by: विनायक गावस
Published on: July 28, 2023 21:56 PM
views 135  views

सावंतवाडी : आयुष्याच्या उभारणीसाठी, उत्कृष्ट ज्ञान प्राप्त करण्यासाठी पाया भक्कम असणे आवश्यक आहे. तुमचे यश तुमच्या हातात आहे.पुढील यशस्वी जीवनाचा पाया शालेय जीवनातच घातला पाहिजे. त्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष  विकास सावंत यांनी केले. आर.पी. डी. हायस्कूलच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणगौरव पसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी घेण्यात येणा-या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा   ( इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, सावंतवाडी या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इ. 5 वी च्या 1 व इ. 8 वी च्या 4 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. त्यांमध्ये इ.5 वी मधील कु. साईराज सुनिल राऊळ (220 गुण) याने शहरी सर्वसाधारण विभागातून जिल्ह्यात 25 वा क्रमांक पटकाविला आहे.  तसेच इ. 8 वी मधील शहरी सर्वसाधारण विभागातून  कु. ओजस गोकुळदास मेस्त्री (238 गुण) याने जिल्ह्यात चौथा ,कु. अभिजीत उत्तम कुडव (192 गुण) याने जिल्ह्यात 42 वा, कु. अथर्व भारत बांदेकर (190 गुण) याने जिल्ह्यात 43 वा , कु. काजल सुभाष गावडे (188 गुण) हिने जिल्ह्यात 47 वा क्रमांक पटकाविला आहे. अशाप्रकारे एकूण 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. याशिवाय इ. 6 वीत नविन प्रवेशित कु. कर्तव्य तेजस बांदिवडेकर याने राष्ट्रीय ग्रामीण विभागातून 90 टक्के गुणांसह जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना कै.पार्वती व कै.महादेव लक्ष्मण धारगळकर यांचे स्मरणार्थ श्रीम.मुग्धा दिनेश नागवेकर पुरस्कृत रोख रक्कमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.तसेच शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संस्थेचे सचिव व्ही.बी.नाईक पुरस्कृत बक्षिसे देण्यात आली. यासोबतच इ.8 वी NMMS शिष्यवृत्तीधारक कु. प्रिया बन्सीधर चव्हाण व सारथी शिष्यवृत्तीधारक कु. स्मिताली गुरुनाथ राऊळ , कु. वेदांत दिलीप देसाई, कु. पियुष सच्चिदानंद परब, कु. प्रसाद महादेव सावंत, कु. हर्षदा सहदेव सरमळकर या एकूण 6 विद्यार्थ्यांना श्री. अरविंद विठ्ठल साळगावकर उपमुख्याध्यापक पुरस्कृत रोख रक्कमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.यावर्षीही गतवर्षीपेक्षा जास्त विद्यार्थी प्राथमिक - माध्यमिक शिष्यवृत्ती व NMMS शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील यासाठी आमच्या शिक्षकांचे प्रयत्न आणि नियोजन आहे असा विश्वास प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक , शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संचालक चं. मु. सावंत, अमोल सावंत, सौ. वसुधा मुळीक, सतीश बागवे, श्रीम. सोनाली सावंत, मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपमुख्याध्यापक अरविंद साळगावकर, पर्यवेक्षक पी. एम.सावंत इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. पी.पी. सावंत , आभार श्रीम. आर.जी.राणे व  सूत्रसंचालन श्रीम.पी.एच. कदम यांनी केले.