
देवगड : देवगड रोटरी क्लब मँगो सीटीच्यावतीने तालुक्यातील कोटकामते, कुणकेश्वर, मुटाट या माध्यमिक शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी अॅपची सुविधा देण्यात आली.
रोटरी क्लब मँगो सीटीच्यावतीने देवगड तालुक्यातील भगवती माध्यमिक विद्यामंदीर कोटकामते, कुणकेश्वर माध्यमिक विद्यामंदीर, मुटाट हायस्कूल या प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्डटी अॅपची सुविधा देण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष गौरव पारकर, सचिव अनुश्री पारकर, रो.श्रीपाद पारकर, रो.विजय बांदिवडेकर, रो.अनिकेत बांदिवडेकर, रो. अयोध्याप्रसाद गावकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.दहिबांवकर, गुरूनाथ घाडी आदी उपस्थित होते.
दहावीच्या विद्याथ्र्यांना शालांत परीक्षेत कशा पध्दतीची प्रश्नपत्रिका असणार आहे. मागील परीक्षेमध्ये कशापध्दतीचे प्रश्न आले होते. संभाव्य प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असणार आहे याची उत्तरासहीत माहिती आयडीयल स्टडी अॅपमधून देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुलभ होणार आहे तसेच सामान्य ज्ञानाचीही माहिती या अॅपमधुन मिळणार आहे. दहावीनंतर आपण काय करावे याची माहिती उपलब्ध आहे
कोटकामते माध्यमिक विद्यामंदीरला रोटरी क्लब मँगो सीटीच्यावतीने प्रयोगशाळेचे साहित्य देण्यात आले. या हायस्कूलला प्रयोगशाळा साहित्य द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. याची तात्काळ दखल रोटरी कल्बचे अध्यक्ष गौरव पारकर यांनी घेवून शाळेला प्रयोगशाळा साहित्य या कार्यक्रमावेळी प्रदान करण्यात आले.