गणेशोत्सवानिमित्त रस्सीखेच स्पर्धा | वैभववाडीतील गणेश उत्सव कला, क्रिडा मंडळाचे आयोजन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 16, 2023 11:52 AM
views 106  views

वैभववाडी : गणेशोत्सवानिमिमित्त येथील गणेश उत्सव कला,क्रिडा मंडळाच्यावतीने यावर्षी खुल्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दि.२५सप्टेंबर रोजी शहरातील सार्वजनिक पटांगणावर दुपारी ३ वा ही स्पर्धा सुरू होणार आहे.

शहरातील गणेशनगर गणेश उत्सव कला,क्रिडा मंडळाच्यावतीने येथे सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी साजरा होतो.यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यावर्षी या मंडळाने खुल्या रस्सीखेच स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेतील विजेत्या संघाला ११हजार १११रुपये व उपविजेता संघाला ७हजार ७७७रुपये आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अक्षय मोहीते अक्षय मोहीते ९९२२५७०३९९, रविंद्र भागवत ८९९०३७४२९यांच्याशी संपर्क साधावा.या स्पर्धेकरिता जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.