युवासेनेचे ते प्रश्न योग्यच...

जनतेतून उत्तम प्रतिसाद : रोहीत पावसकर
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 18, 2023 18:34 PM
views 199  views

वैभववाडी  : कणकवली विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विषयासंदर्भात युवासेनेकडून दहा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याची पत्रके या मतदारसंघात वाटप केली जात आहेत. हे प्रश्न योग्यच आहेत याबाबत जनता समाधान व्यक्त करीत आहेत. युवासेनेचे हे प्रश्न जनता निवडणूकीच्या वेळी नक्कीच विचारेल असा विश्वास युवा सेनेचे तालुकाप्रमुख रोहीत पावसकर यांनी व्यक्त केला आहे.

   युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विचारलेल्या दहा प्रश्नांची पत्रके भुईबावडा, उंबर्डे,कोळपे, महबूबनगर, वैभववाडी शहर येथे वाटप करण्यात आली. जनतेपर्यंत ही पत्रके पोहचविण्यात आलीत. कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यात १० हजार पत्रक वाटप करण्यात येणार आहेत. युवासेनेच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून याभागातील अनेक समस्या असल्याचे लोकांनी सांगितले. स्थानिक आमदार नितेश राणे यांनी निवडणूकीत दिलेल्या घोषणाच राहील्या आहेत. जनतेच्या मनातील प्रश्न युवासेने उपस्थित केले आहेत. आगामी निवडणूकीत येथील जनता हेच प्रश्न सत्ताधारी आमदारांना विचारणार आहे असं श्री.पावसकर यांनी सांगितले.

यावेळी  युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर, युवासेना सरचिटणीस स्वप्निल धुरी, युवासेना उपजिल्हाप्रमुख अतुल सरवटे, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावस्कर, बाबा मोरे उप तालुका संघटक, जनार्दन विचारे माजी उप तालुका प्रमुख, रवी मोरे शिवसेना शहरप्रमुख, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, नगरसेवक मनोज सावंत, सरपंच कोळपे सुनील कांबळे,  युवासेना विभागप्रमुख कोकेसरेमयूर दळवी,  युवासेना खांबाळे विभागप्रमुख गणेश पवार, शिवसेना विभागप्रमुख कोकिसरे विठोजी पाटील, युवासेना कोकिसरे विभाग संघटक संदेश सुतार, मंथन सुतार, गणेश धुरी, शुभम चव्हाण आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.