रोहित पावसकर अजून बालिश : वैभवी दळवी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 18, 2023 20:56 PM
views 222  views

वैभववाडी : वैभववाडी उबाठा सेनेचे रोहित पावसकर हे अजून बालिश आहेत. राजकारणातल  तरी त्यांना माहित आहे का ? भाजपचे जेष्ठ पदाधिकारी अरविंद रावराणे यांच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांनी आपली पातळी तपासावी. अरविंद रावराणे यांच्या तिकिटाची काळजी पावसकर यांनी करू नये. स्वतःच्या पोटापाण्याची काळजी त्यांनी करावी. नेतेगिरी करण्यापेक्षा कुठेतरी कामधंदा करावा आणि कुटुंबाला हातभार लावावा अशी टीका उंबर्डे सरपंच वैभवी दळवी यांनी केली

उबाठा सेनेचे रोहित पावसकर यांनी भाजपाचे अरविंद रावराणे यांच्यावर टीका केली. त्यांना प्रशासनातील काही कळत नाही, तिकिटासाठी धडपडत असल्याचे पावसकर यांनी म्हटले होते. त्याला प्रसिद्धी पत्रकातून दळवी यांनी उत्तर दिले आहे.


ग्रामपंचायत सदस्य असलेले पावसकर हे मासिक सभेला तरी जातात का ? ग्रामपंचायतच्या योजनांची माहिती तरी त्यांना आहे का? अद्याप ते स्वतःचा रस्ता करू शकले नाही. राजकारणाच्या फंद्यात पडण्यापेक्षा त्यांनी आपले उदरनिर्वाचे साधन निर्माण करावे.



अरविंद रावराणे हे गेली 30 वर्ष राजकारणात आहेत. यांना प्रशासनाचा व राजकारणाचा मोठा अनुभव आहे. गरीब गरजूंना त्यांनी सढळहस्ते आर्थिक मदत केली आहे. पावसकर यांना ज्यांनी हे पत्रक लिहून दिले, त्यांना जे मार्गदर्शन करीत आहेत त्यांनीच आपले भवितव्य तपासावे.

ज्यांना डॅशिंग व अभ्यासू नेते म्हणता ते वैभव नाईक हे ठेकेदार आहेत. लाखो रुपये ची कामे त्यांची चालू आहेत. त्यांची तळी पावसकर यांनी नाचवत बसू नये. असे पत्रकात दळवी यांनी हटले आहे.