ऑनलाईन खरेदीत ग्राहकांची लुबाडणूक !

शासन-सामाजिक संस्थाकडून जनजागृतीचा गरज : ॲड. नकुल पार्सेकर
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 26, 2023 16:22 PM
views 140  views

सावंतवाडी : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला. त्यावेळी संसदेमध्ये हा कायदा मंजूर करताना राजीव गांधी आपल्या संबोधनात म्हणाले होते की, 'या नवीन कायद्यामुळे ग्राहकांच्या हिताचे निश्चितपणे रक्षण होईल. मात्र, ग्राहक हा राजा असून त्याने आपले अधिकार तपासून खरेदी करताना सजग राहीले पाहिजे'. मात्र हा कायदा होवून तब्बल ३७ वर्षे लोटली तरी आजही मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होते. विशेषतः ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकांची लुबाडणूक होत असून त्यासाठी शासन आणि या चळवळीत काम करणाऱ्या सामाजिक संस्थाकडून जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे असे प्रतिपादन ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य ॲड. नकुल पार्सेकर यांनी केले. सावंतवाडीत राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपस्थित अशासकीय सदस्य व जिल्ह्यातील प्रसिद्ध स्ञीरोगतज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांनी वैद्यकीय सेवेतील अनेक ञुटी व त्यामुळे रुग्णांना होणारा ञास याबाबत माहिती दिली. ग्राहकांन त्यांनी दिलेल्या मोबदल्यात त्यांना योग्य सेवा देण्याचा संबंधित आस्थापनेने प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे असंही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला नायब तहसीलदार  मुसळे, पुरवठा विभागाच्या पुजा सावंत, पंकज किनळेकर आदी उपस्थित होते.