मोकाट गुरांचा रस्तारोको..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 08, 2023 11:56 AM
views 92  views

देवगड : पडेल येथील मुख्य मार्गावर भटके कुत्रे तसेच मुख्य रस्त्यावर गुरांचा  नागरिकांना यामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा प्रत्यय विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांना देखील आला, मोकाट गुरांनी रस्त्यावर ठिय्या मांडून बसल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना आपला गाडीचा मार्ग बदलून पुढचा टप्पा गाठावा लागला.

या मोकाट गुरांपासून पोलिसांची देखील सुटका झाली नसल्याची चर्चा पडेल कॅन्टीन परिसरात चांगलीच रंगली होती. निमित्त होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या 'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमानिमित्त पडेल कॅन्टीन परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकीकडे सभेमध्ये राजकीय प्रतिनिधींनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतानाच मात्र मोकाट गुरांनी यावेळी रस्त्यावर ठिय्या मांडून बसल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे याच वेळी या ठिकाणी आपल्या वाहनांमधून आजूबाजूच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी फेरफटका मारत होते.

मात्र, यावेळी मोकाट गुरांनी रस्त्यावर ठिय्या मांडून बसल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांना देखील आपला मार्ग बदलून पुढे मार्गस्थ व्हावे लागले अशी चर्चा सुरू झाली की मोकाट गुरांनी कायदा व्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना देखील सोडले नाही,अशी एकच चर्चा पडेल कॅन्टीन परिसरात सुरू झाली. पडेल कॅन्टीन परिसरात अशा महत्त्वाच्या रस्त्यावर व चौकात गुरे बिनधास्तपणे वावरतानाचे दृश्य कुठेही दृष्टीस पडते रस्त्यावर फिरतात चौकात भाजीपाला विक्रेते असल्याने बाजी विक्रेत्यावर उरलेले भाजीपाला फेकत असल्याने येथे जनावरांची गर्दी होते. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर बसत असल्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे रस्त्यावर आल्याने अपघात देखील होत आहे. रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी सकाळ संध्याकाळी वाहतुकीची देखील कोंडी होत आहे.या बाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करत या मोकाट गुरांच्या उपद्रवापासून नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांची सुटका होणार आहे का ? असा सवाल नागरिकां कडून उपस्थित केला जात आहे.