
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जन सुविधेमधून मंजूर चाफेड पिंपळवाडी मुख्य रस्ता ते सुरेश राणे घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण मंजूर रस्त्याचे भूमिपूजन आज भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संदीप साटम म्हणाले चाफेड गावच्या सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी घेतली आहे.
विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, जिल्हा पदाधिकारी मंगेश लोके, सुहास राणे,सरपंच महेश राणे, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन साळकर, मानसी परब, राधिका ठुकरूल,प्रदीपा मेस्त्री,संतोष साळसकर, सुनील कांडर सत्यवान सावंत, आकाश राणे,प्रवीण राणे, साहिल मेस्त्री,चंद्रकांत साटम, विजय राणे, रमेश राणे, दीपक राणे, सत्यवान साटम, वैभव राणे,प्रकाश परब, इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.