
सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील रस्त्यावर भगदाड पडल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. काही जागरुक नागरिकांनी ही बाब भाजपचे शहराध्यक्ष, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ यावर लक्ष देत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
नगरपरिषदे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आडिवरेकर यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली. यावेळी या खड्ड्याची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून नवीन टेंडर काढून हे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत आडिवरेकर यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “हे काम मार्गी लावण्याची जबाबदारी माझी आहे. मी ती पूर्ण जबाबदारीने पार पाडेन.” त्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य अपघात टळला असून लवकरच या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे.