LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांबाबत आढावा बैठक

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 16, 2026 17:59 PM
views 41  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज आढावा बैठक मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.जिल्ह्यातील रुग्णांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा तसेच प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी व विभागांना आवश्यक मार्गदर्शन करून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सूचना देण्यात आल्या. सिंधुदुर्गातील नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत कोणतीही अडचण भेडसावू नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला