कबुलायतदार प्रश्नाबाबत महसूलमंत्र्यांचं वेधलं लक्ष

Edited by: विनायक गांवस
Published on: August 13, 2025 18:28 PM
views 82  views

सावंतवाडी : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्या दरम्यान माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतली. यावेळी मौजे आंबोली चौकूळ गेळे येथील कबूलातदार गावकार जमिनीवरील वनखात्याची नोंद कमी करण्याबबातचा शासन निर्णय झालेला असुन त्याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी होण्यासाठी वन मंत्री व संबधित अधिकारी यांच्या समवेत महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यासदंर्भात निवेदन दिले. 


 महसुल मंत्री यांनी याबाबात तात्काळ पुढील आठवडयात बैठक आयोजित करुन याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे मान्य केले. तसेच मौजे चौकुळ आंबोली व गेळे येथील कबुलातदार गावकर जमिनीचे वाटप लवकरच करण्यात येणार असून ही गावे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असल्याने या गावांची मोजणी पारंपारिक पध्दतीने करण्यासाठी अडचण येत आहे. तरी या गावांची मोजणी आधुनिक तंत्रज्ञान वापरुन तसेच प्रशिक्षित पथकामार्फत करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य प्रशासनास उपलब्ध करुन देण्यासाठी श्री. केसरकर यांनी निवेदन दिले. यावर महसुल मंत्री यांनी लवकरात लवकर आवश्यक मोजणीचे अत्याधुनिक साहित्य व विशेष प्रशिक्षित पथक उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले.