
सिंधुदुर्गनगरी : सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असतो. महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाचा, प्रशासनाचा कणा असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवा देण्याचे काम महसूल विभाग करतो. नागरिकांचे विनासायास व कमीत कमी कष्टामध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढून सामान्य नागरिकांना न्याय देऊन त्यांचे जीवन सुकर बनविणे हे आपले कर्तव्य असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पी.एम.विश्वकर्मा जिल्हा स्तरीय समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा नियोजन समीतीचे सदस्य सचिन वालावलकर तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जमीनीचे अभिलेख तयार करणे, अद्ययावत ठेवणे, सातबारा अद्ययावत ठेवणे व नागरिकांना सहजरित्या उपलब्ध करुन देणे हे महसूल विभागाचे प्रमुख कार्य आहे. हे काम करत असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आनंदाने काम करावे. आनंदाने काम केले तर आपण तणावमुक्त राहतो. तणावमुक्त राहिल्याने आपल्याकडून आणखी चांगले काम होते. शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी व्हावे असेही ते म्हणाले.
कामाचे परिक्षण होणे आवश्यक- रविंद्र खेबुडकर
प्रशासनात काम करत असताना आपण अनेक योजना, उपक्रम राबवित असतो. आपल्या कामांतून सामान्य नागरिकांना लाभ झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण काम करत असतो. पण असे काम करत असताना आपण केलेल्या कामाचे परिक्षण होणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. कामाचे परिक्षण केल्याने झालेल्या चुका आपण टाळू शकतो. यामुळे आपली आणि पर्यायाने आपल्या विभागाची प्रतिमा सुधारते. नागरिकांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे आपण आपल्या कामांतून सामान्य घटकांना न्याय देण्याचे काम करावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर म्हणाले.
योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम महसूल विभाग करतो - नयोमी साटम
महसूल विभाग हा स्वातंत्र्य पूर्वीपासून कार्यरत आहे. काळानुरूप आता या विभागाच्या कामाचे स्वरुप बदलले असून कामाची व्याप्ती देखील वाढली आहे. योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम महसूल विभाग करत असतो. महसूल आणि पोलिस प्रशासन समन्वयाने काम करत असल्याने कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी मदत होत असल्याचे अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम म्हणाल्या.
महसूल हा शासनाचा कणा - शुभांगी साठे
महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. हा विभाग शासनाच्या प्रत्येक योजना, उपक्रम राबविण्यात मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो असे अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या.
अधिकाऱ्यांची कार्यतत्परता कौतुकास पात्र : मनीष दळवी
सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची जनतेशी घट्ट नाळ जोडलेली असणे आवश्यक आहे. तसेच सामान्यांना न्याय देण्यासाठी बांधिलकी देखील तेवढीच महत्वाची आहे. जिल्ह्यात कार्यरत अधिकारी जिल्ह्याच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील असून त्यांची कार्यतत्परता कौतुकास पात्र असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले.
नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य : प्रभाकर सावंत
नागरिकांच्या समस्या ऐकूण त्या सोडविणे आवश्यक आहे. महसूल विभागातील अधिकारी नेहमीच नागरिकांना कामाच्या माध्यमातून न्याय देत असतात. त्यांचे छोटे छोटे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी नेहमीच तत्पर असल्याचे श्री. सावंत म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी महसूल दिनाचे आयोजन करण्यामागचा उद्देश सांगितला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन कशाप्रकारे संगणकीकरणामध्ये आघाडीवर आहे हे सविस्तर सांगितले. जिल्ह्यात फेरफार प्रक्रिया कमीत कमी कालावधीमध्ये कशा प्रकारे केल्या जाते हे त्यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजश्री सामंत यांनी तर आभार श्रीमती सावंत यांनी मानले.
महसूल दिनानिमित्त विविध दाखले वितरण आणि विशेष सहाय आर्थिक योजनेअंतर्गत लाभ वाटप कार्यक्रम तसेच महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी/ कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा देखील यावेळी पार पडला.
प्रधानमंत्री जनजाती आधिवासी न्याय महाअभियानांतर्गत घरकूल योजनेअंतर्गत देवगड तालुक्यातील दाभाळे येथील गणपत शिवराम पवार यांना घरकुल बांधणेसाठी मौजे सौंदाळे ता. देवगड येथील ०.५० आर. जागा मंजूरीच्या आदेशाचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी-
१. आरती शंकर देसाई, उपजिल्हाधिकारी भूसंपादन
२. जगदीश कातकर, उपविभागीय अधिकारी, कणकवली
३. शीतल जाधव, तहसिलदार पुनर्वसन
४. श्रीधर बाजीराव पाटील, तहसिलदार, सावंतवाडी
५. राजश्री सामंत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,
६. रईस पटेल, जिल्हा विधी अधिकारी
७. शिवाजी राठोड, नायब तहसिलदार, महसूल
८. प्रज्ञा विजय राजमाने, निवासी नायब तहसलिदार ,दोडामार्ग
९. विठोबा सावंत, लघुलेखक, जिल्हाधिकारी कार्यालय
१०. अनिल पवार, सहायक महसूल अधिकारी
११. सर्जेराव रामकृष्ण राणे, सहायक महसूल अधिकारी, कणकवली
१२. निलीमा सावंत, मंडळ अधिकारी
१३. शरद कृष्णा शिरसाट, मंडळ अधिकारी, कसई
१४. प्रितम माळी, महसूल सहायक, जिल्हाधिकारी कार्यालय
१५. अमोल पाटील, महसूल सहायक, वैभववाडी
१४ अनिल गावडे, ग्राम महसूल अधिकारी, वजराट
१५ बाळकृष्ण रणसिंग, वाहन चालक
१६ मारोती ओंबासे, वाहन चालक, कुडाळ
१७ पंढरीनाथ गोसावी, नाईक
१८ दिलीप चव्हाण, शिपाई, मालवण
१९ शंकर रावले, शिपाई
२० सुभाष जाधव, महसूल सेवक
२१ दिलीप राणे, पोलीस पाटील
विविध दाखल्यांचे वाटप-
संजय गांधी योजना, कणकवली
प्रकाश कृष्णा शिंदे, श्रीमती सफीया मुबारक नावळेकर, श्रीमती अंजनी ब्रम्हाजी चव्हाण
जातीचे दाखले- उदेश समीर जाधव , फोंडाघाट
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWSE)- सोनिया आंगणे
शिधापत्रिका- श्रीमती. भावना चव्हाण, तानाजी बाजारी,
कुडाळ तालुका-
संजय गांधी योजना - बापू मनोहर परब, श्रीम. कीर्ती किशोर मसुरकर, मनोहर साबाजी हिंदळेकर,
जातीचे दाखले- मंदार रवींद्र पावसकर, गोपाळ बाळकृष्ण हळदणकर, भाग्यश्री तुकाराम बावकर,
शिधापत्रिका- संचिता सचिन नाईक.
सावंतवाडी तालुका -
आर्थिक दुर्बल घटक- अशोक नेवगी
जातीचे दाखले- प्रथमेश सुधारक कानसे, गंगाराम पदू जंगले,