
दोडामार्ग : हेवाळे – बाबरवाडी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव लक्ष्मण ठाकुर ( वय ९१ ) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. साटेली – भेडशी येथील माऊली मेडिकल स्टोअर व रजनी क्लिनिकल लॅबचे मालक आनंद ठाकूर यांचे वडील होत. तर सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागात जिल्हा पर्यवेक्षक राजन ठाकूर व ठाणे मुंबईतील उद्योजक हेमंत ठाकूर यांचे ते काका होत. महादेव ठाकूर यांनी आपल्या शिक्षकी पेशात असताना अनेक विद्यार्थी घडवले आहे.
महादेव ठाकूर हे तिलारी, तसेच आयनोडे पुनर्वसन येथील आसपासच्या परिसरातील गावात ते ठाकूर गुरुजी म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.