
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा मालवण येथील चिवला बीच परिसरातील Kalbadevi Exotika Resort येथे बुधवारी उत्साहात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यास जिल्ह्यातील बँकेचे सेवानिवृत्त सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात स्व. शिवरामभाऊ जाधव व स्व. डी. बी. ढोलम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर महिला सेवकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या प्रसंगी ८० वर्षांवरील सेवानिवृत्त सेवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर याप्रसंगी अनेक ज्येष्ठ सेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनीही मेळाव्यास उपस्थित राहून सेवानिवृत्त सेवकांना शुभेच्छा दिल्या. स्नेहमेळाव्याच्या आयोजनासाठी डी. डी. आरेकर, देवानंद लोकेगांवकर, मिलिंद सावंत, सतीश नाईक, अमित पंडित, रामदास रासम, नंदकुमार रेडकर, आर. वाय. सावंत, अजित महाडिक तसेच इतर सेवानिवृत्त सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. बी. शिरसाट यांनी केले.










