शेकोटीत होरपळून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा अंत

Edited by: विनायक गांवस
Published on: December 23, 2025 21:52 PM
views 130  views

सावंतवाडी : शेर्ले - आरोसबाग परिसरात शेकोटी घेत असताना आगीत होरपळून एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. 


अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. थंडीपासून बचावासाठी घराजवळ शेकोटी घेत असताना अचानक आग भडकली. यात अविनाश चांदेकर गंभीररीत्या होरपळले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. अविनाश चांदेकर हे येथील श्री स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्या बांदा शाखेत शिपाई पदावर कार्यरत होते आणि तेथून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.