
वेंगुर्ला : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ५४ रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान केले.
शिबिर शिवसेना वेंगुर्ला, युवासेना आणि महायुती यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला, आणि समर्पण फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. वेताळ प्रतिष्ठानचे हे सलग ३० वे रक्तदान शिबिर होते.
शिबिराचे उद्घाटन वेंगुर्लेचे तहसीलदार ओंकार ओतारी आणि प्राचार्य प्रा. डॉ. डी. बी. गोस्वामी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी बोलताना तहसीलदार ओतारी म्हणाले, "रक्तदान हे केवळ सामाजिक दायित्व नसून, ते माणुसकीचे प्रतीक आहे." प्राचार्य गोस्वामी यांनी आपल्या भाषणात "विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे," असे मत व्यक्त केले.
व्यासपीठावर शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, जि.प. माजी सभापती दादा कुबल, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, वेताळ प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, महिला तालुका संघटिका दिशा शेटकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, शहरप्रमुख सागर गावडे, ॲड. श्रद्धा परब-बाविस्कर, संजना परब, शबाना शेख, तसेच ओरोस जिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गजानन मोतीफळे व डॉ. प्रदीप चौधरी, समर्पण फाउंडेशन चे सुहास कोळसुलकर, महेंद्र मातोंडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले.
शिबिराला भेट देऊन शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये भाजप वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पप्पू परब, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, व सायमन आल्मेडा यांचा समावेश होता. सर्व रक्तदात्यांचा "कल्पवृक्ष" देऊन सन्मान करण्यात आला, तसेच उपस्थित मान्यवरांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
शिबीर यशस्वी होण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे सुधीर चुडजी, मंगेश सावंत, संजय पाटील, डॉ. गोविंद धुरी, सद्गुरू सावंत, प्रदीप परुळकर, प्रसाद भणगे, सानिया वराडकर, विधी नाईक, निकिता कबरे, जान्हवी सावंत, धीरज आळवे, शंकर देसाई, श्रीधर केरकर, सुनील आळवे, हितेश कोचरेकर, व मोहन मोबारकर यांनी मोलाचे योगदान दिले.
सामाजिक बांधिलकी जपत वेंगुर्ल्यात घडलेले हे शिबिर एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.