तळकटमधील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

Edited by: लवू परब
Published on: October 23, 2025 18:26 PM
views 17  views

दोडामार्ग : अष्टविनायक मित्रमंडळ तळकट कट्टा, तळकट ग्रामपंचायत आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, शाखा - दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे शिबीर तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.अंधारे, डॉ.राणे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, सरपंच सुरेंद्र सावंत, उपसरपंच रमाकांत गवस, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडीचे डॉ.बाळासाहेब नाईक आणि कर्मचारी वर्ग, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्गचे प्रसिद्धीप्रमुख भूषण सावंत, व्हाइस ऑफ मीडिया दोडामार्ग तालुकाध्यक्ष आपा राणे, निवृत्त मुख्याध्यापक दुर्गाराम गवस, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत राऊळ, ल्विवेक मळीक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी प्रकाश तेंडुलकर आणि डॉ.बाळासाहेब नाईक यांनी रक्तदानाबाबत मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये रक्तदान आणि रक्तगट तसेच हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यावेळी पंचवीस रक्तदात्यानी रक्तदान केले. एकूण पुरुष आणि महिला असे पंचेचाळीस जण रक्तदान करण्या साठी इच्छुक होते. पण महिला मध्ये हिमोग्लोबिन प्रमाण कमी असल्याने आणि काही तांत्रिक अडचणी मुळे काही जण रक्तदाना पासून वंचित राहिले.

या शिबिरासाठी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिकांनी भेट देऊन उपक्रमात सहभागी झाले. एम डी धुरी, विजयकुमार मराठे, विठ्ठल (बाबा) देसाई, भिकाजी जोशी, एकनाथ गवस, सुरेश काळे, अमोघ सिद्धे, सिद्धेश देसाई, राघोबा देसाई असे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य केले.

आरोग्य कर्मचारी आशा संजना नांगरे, अंगणवाडी शिक्षिका दिव्या देसाई आणि आरोग्य कर्मचारी प्रणाली प्रभाकर देसाई यांनीही सहकार्य केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सुरेंद्र सावंत, गोविंद ( ताता) देसाई, मनोहर सावंत, दत्तप्रसाद सावंत, रमेश शिंदे, प्रज्योत देसाई, संदीप वेटे, बाळू राणे, रामचंद्र (पप्पू) नाईक, सगुण (बबलू) नाटेकर, शिवप्रसाद नाटेकर, गौरेश गवस, शशिकांत राऊळ, विवेक मळीक, चंद्रहास राऊळ, बाबल गवस, राघोबा देसाई आणि तळकट कट्टा येथील युवा वर्ग यांनी विशेष प्रयत्न केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार माजी सरपंच तथा शिक्षक रमेश शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक गोविंद गवस यांनी केले.

सर्व ग्रामस्थांनी केलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे दीपावली सणाच्यावेळी आम्ही हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी, सावंतवाडी यांनी तळकट वासियांचे विशेष आभार मानले.