
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 21 नोव्हेंबरला झालेल्या महारक्तदान शिबिरामध्ये काहीजण काही कारणास्तव आले नव्हते त्यासाठी हे शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील 02 MHA NAVAL UNIT (NCC RATNAGIRI) चे कमलेश पेडणेकर, श्रेयश पेडणेकर, सोहम हिर्लेकर, सुजल कोरगावकर, वसंत बुगडे, साहिल दळवी, विशाल नाईक, मंजिरी पास्ते, संध्या कांबळी, जानवी नाईक, श्रावणी बाबर देसाई ,अतिश माईनकर अशा बारा विद्यार्थ्यांनी रक्तदान केले तर अन्य श्रीराम बागवे व कमलेश दळवी अशा दोन व्यक्तीने या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला होता-
एकूण 14 जणांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व संजय पेडणेकर यांनी पुढाकार घेतला. सर्व रक्तदात्यांना सामाजिक बांधिलकी कडून सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी युवा रक्तदाता संघटना चे अध्यक्ष देव्या सूर्याजी, डॉ. मुरली, रक्तपेढीतील व्यवस्थापक प्रशांत सातार्डेकर व अनिल खाडे उपस्थित होते.