पत्रकार महिलांचा सन्मान ; सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुढाकार

Edited by: ब्युरो
Published on: March 08, 2024 11:14 AM
views 58  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने महिला दिनाचं औचित्य साधतं पत्रकार महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. विनया बाड, कोकण विभाग महिला अध्यक्षा, राष्ट्रवादी अर्चना घारे - परब, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, खजिनदार रामचंद्र कुडाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुका पत्रकार संघ अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केलं.  यावेळी ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत, पत्रकार दिव्या वा्यंगणकर, पत्रकार मंगल नाईक जोशी, कोकणसाद LIVE च्या जुईली पांगम, पत्रकार अनुजा कुडतरकर यांचा सन्मान करण्यात आला.  तर डॉ. विनया बाड, अर्चना घारे परब यांचा सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला.

पत्रकारांना निष्पक्ष होऊन लिहिता आलं पाहिजे, निर्भीड होऊन बोलता आलं पाहिजे. महिला पत्रकारांनी स्वरक्षणाचे धडे घेऊन आणखीन कणखर होऊन काम करावं, असं आवाहन डॉ. विनया बाड यांनी केलं. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण पाहत महिला कुठेच मागे नाहीत. हाच सिंधुदुर्गचा आदर्श इतर जिल्ह्याने घ्यावा. महिलांनी संघटीत  होत विधायक काम करण गरजेचं आहे. महिला हळव्या असतात मात्र संकट आलं तर त्याच खंबीरपणे उभ्या असतात, अशी भावना अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली. 

आज सर्व क्षेत्रात महिलांच्या बरोबरीने काम करतात. हे बदल कौतुकास्पद असल्याचं ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक म्हणाले. 

जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, ज्येष्ठ पत्रकार राजेश मोंडकर, पत्रकार काका भिसे, नितेश देसाई सायली दुभाषी, पूजा दळवी, नरेंद्र देशपांडे, नितेश देसाई उपस्थित होते. आभार ज्येष्ठ पत्रकार राजेश मोंडकर यांनी मानले. सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी केलं.