
वेंगुर्ले : कोचरे उत्कर्ष (डॉ. शिरोडकर )सहकारी पतसंस्था मर्या. कोचरे या पतपेढीच्या निवडणुकीत उत्कर्ष सहकार पॅनलचा विजय झाला. यामध्ये कोचरा गावचे माजी सरपंच सुनील करलकर, विद्यमान उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, शिवसेना विभाग प्रमुख दत्ता साळगांवकर, माजी सरपंच यशवंत गोसावी, अर्जुन( आबा )प्रभू.दत्ताराम ( बाळू )राणे, अनंत म्हापणकर, गुरुजी.प्रदीप राऊळ, कीर्ती गावडे, रंजना हंजनकर नारायण नरे, उपेंद्र रावले हे भरघोस मतांनी निवडून आले. गेली २५ वर्ष ज्या गटाजवळ पतसंस्था होती त्या गटाजवळ पुन्हा सत्ता आली आहे.
दरम्यान या निवडणुकीत तंटामुक्ती अध्यक्ष ब्रिजेश तायशेटये, ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तथा माजी ग्रा प सदस्य प्रतीक्षा पाटकर यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईचे माजी नगरसेवक अरुण नरे उपस्थितीत होते. तसेच कोचरे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उदय फणसेकर.निवती ग्रामपंचायत सरपंच अवधूत रेगे आणी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थितीत होते. निवडणूक अधिकारी प्रशांत साळगांवकर यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. शेवटी उदय फणसेकर यांनी मतदारांचे आणी निवडणूक कर्मचाऱ्यांचे आभार मानले.