
मालवण : क्रिएटिव्ह टीचर्स फोरम, कोल्हापूर आणि बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने आयोजित ‘ध्येयवादी शिक्षकांची घडण’ या विषयावर शनिवार दि.15 ते 17 फेब्रुवारी,2025 रोजी तीन दिवशीय निवासी शिक्षक शिबीर मालवण येथील बॅ.नाथ पै सेवांगणात झाले. शिबीराचे उद्घाटन सेवांगणचे अध्यक्ष ॲड देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार होते.
या शिबीरात ‘ध्येयवादी शिक्षक: सानेगुरुजी’ विषयावर देवदत्त परुळेकर, ‘शिक्षक -विदयार्थी स्नेहबंध’ विषयावर समाजसेविका रेणू गावस्कर, ‘बहुजन उध्दारक: डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील’ विषयावर डॉ.बी.एम.हिर्डेकर, ‘शिक्षणातील सुवर्णकण’ विषयावर शिल्पा खेर, ‘कोकण विकासक- वि.स.खांडेकर’ विषयावर डॉ.सुनीलकुमार लवटे, ‘वर्तमान शिक्षकांपुढील आव्हाने’ विषयावर डॉ.राजेंद्र कुंभार, ‘जगातील नवे शिक्षण’ विषयावर सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर यांनी विवेचन केले. समारोप प्राचार्य प्रवीण चौगले व प्राचार्य डॉ.जी.पी.माळी यांच्या मार्गदर्शनाने झाला. या निवासी शिबीरात मुख्याध्यापक सुनील स्वामी यांनी ‘संविधनाचे किर्तन’ सादर केले तर साथी बाबा नदाफ यांनी प्रबोधनपर गाणी सादर केली.
यावेळी डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण जोशी यांच्या समग्र वाड्गमय ग्रंथाचे 18 खंड बॅ.नाथ पै सेवागण येथील ग्रंथालयास भेट दिले. या शिबीरात सौ. मंगल परुळेकर, क्रिएटीव्ह टीचर्स फोरमचे दीपक जगदाळे, विजय एकशिंगे, चंद्रकांत निकाडे, भीवाजी काटकर, संजय कळके, डॉ.संजय जगताप, एस.डी.पाटील, अशोक हुपरे, परशराम आंबी, धनाजी माळी, संजय पाटील, सुधाकर सावंत यांच्यासह कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हयातील शिक्षक उपस्थित होते.गुलाब आत्तार यांनी सुत्रसंचालन केले, दीपक जगदाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर संजय कळके यांनी आभार मानले. यावेळी सानेगुरुजी, वि.स.खांडेकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.