कुडाळातील बैल बाजार पूर्ववत सुरू करा

सिंधुदुर्ग शेतकरी महासंघाची मागणी
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 27, 2023 14:25 PM
views 152  views

कुडाळ : कुडाळ ग्रामपंचायत काळात बैल विक्री बाजार सुरू होता तो कोरोना काळात बंद झाला आहे. बैल बाजार पूर्ववत सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी महासंघाच्या वतीने कुडाळ नगरपंचायत चे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बबलू भोगटे, अवी शिरसाट, संदीप मयेकर, फिरोज खतीब, शाहिद शेख, हाजिम मुजावर, अभिषेक वाटवे आदी उस्थित होते.

कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी असून आमचा उदरनिर्वाह हा शेती व तत्सम व्यवसायावर होतो जिल्ह्यात बहुतांशी शेतकरी हा गाई म्हैस बैल इत्यादींचे पालन करून आपला उदरनिर्वाह करत असतो परंतु कुडाळ शहरात ग्रामपंचायत कालीन बैल बाजार सुरू होता तो गेली काही वर्ष पूर्ण काळात बंद झाल्यामुळे शेतकरी राजाला बैल विक्री करणे अत्यंत कठीण झाले आहे. पूर जिल्ह्यात शेतीला लागणारी जनावरे यांची खरेदी विक्री करण्यासाठी शेतकऱ्याला कुडाळ शहरातील बैल विक्री बाजार बंद झाल्यामुळे अवघड होत आहे.

तरी कृपया कुडाळ शहरातील आपल्या अत्यारीत येणारा बैल विक्री बाजार पूर्ववत सुरू करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे त्यासाठी आपल्या नगरपंचायत चा बैल विक्री कर भरण्यासाठी आम्ही शेतकरी तयार आहोत तरी नगरपंचायत बैल बाजारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.