देवगडातील ७२ सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 08, 2025 19:17 PM
views 389  views

देवगड : सोडत पध्दतीने देवगड तालुक्‍यात ७२ सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहे. देवगड तालुक्यातील  या ७२ ग्रामपंचायतींचे प्रवर्ग निहाय सरपंच आरक्षण उपविभागीग अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत देवगड तहसीलदार कार्यालय देवगड येथे आज मंगळवार ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठिक ११वाजता देवगड सोडत पध्दतीने विद्यार्थ्यांच्या हस्ते (चिठ्या टाकून) आरक्षण निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१/१९९४ नुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार शासनाने मुंबई ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक १९६४ मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारित तरतुदी निश्चित केलेल्या आहेत. ही निवडणूक नियमातील नियम २ (अ) (१) (२) पोट कलम ४ ते ६ मधिल तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी व महिला सरपंच आरक्षित करावयाची

आहेत. मा. ग्रामविकास विभाग, मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-य दिनांक ५ मार्च २०२५ व तसेच मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांजकडील पत्र क्र. साशा/डेस्क-१ (३) / सरपंच आरक्षण/सोडत/०३/२०२५ दिनांक २८.०३.२०२५ अन्वये देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित केले.

देवगड तालुक्यातील ७२ सरपंच पदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची पुढील प्रमाणे सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. यामध्ये अनु. जाती आरक्षित पदे प्रवर्ग २, ग्रा प हडपीड, कुणकवण, महिला २, ग्रा प. दहीबाव महाळुंगे, अनु. जमातीसाठी आरक्षित १ ग्रा प पेंढरी,, (महिला), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदे प्रवर्ग १०, बुरबावडे, उंडिल, तोरसोळे, मुणगे, गवाणे, दाभोळे, विजयदुर्ग, कातवण, कट्टा, शिरगाव, नामाप्र महिला ग्रा प १० यात इळये, कुवळे, नाडण, तळवडे, वळीवंडे, हिंदळे, पावणाई टेंबवली, कुणकेश्वर मणचे व खुला प्रवर्गामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग २३, ग्रा प. गढिताम्हणे, आरे, शिरवली, मुटाट, पोंभुरले, कोटकामते, पुरळ, रहाटेश्वर, पोयरे, गिर्ये, साळशी, गोवळ, फणसगाव, विठ्ठलादेवी, लिंगडाळ, मोंड, वाघोटण, रामेश्वर धालवली, वानीवडे, मळेगाव, पडवणे, ठाकूरवाडी यांचा समावेश आहे तसेच सर्वसाधारण 

 ग्रा प कोर्ले,मिठमुंबरी, चांदोशी, ओंबळ, नारिंग्रे, खुडी, नाद, वाघिवरे, किंजवडे, पडेल, वाडा, बापर्डे, वरेरी, मिठबाव, पाटगाव, सांडवे, चाफेड, पाटथर, पाळेकरवाडी, मोडपार, फणसे,तिर्लोट, सौंदाळे, तांबळडेग आदी महिला २४ सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने (चिठ्या टाकून) आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.