
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची मिहीर मठकर यांच्यासह सावंतवाडी टर्मिनस प्रेमी संघटनेच्या सदस्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनससह विविध मागण्यांचे निवेदन दिले.यामध्ये एक्स्प्रेस गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा द्यावा तसेच कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या गाड्या तातडीने सुरु कराव्यात, या मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. याचसोबत सावंतवाडी स्टेशनचे फेज १ चे काम पुर्ण होत आले असले तरी फेज २ चे काम अद्याप अपूर्ण आहे. यासाठी आणखी ८.१४ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून हा निधी मंजूर करणे आवश्यक आहे. याशिवाय सावंतवाडी ते वसई आणि सावंतवाडी ते पुणे या मार्गावर दोन नव्या गाड्या सुरु कराव्यात या आणि इतर मागण्यांसाठी त्यांनी निवेदन दिले. याबाबत सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांच लक्ष वेधत या मागण्यांचा प्राधान्याने सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा असं आवाहन केलं आहे.