
देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून शांता शेळके पुरस्कार प्राप्त लेखक प्रा. अविनाश बापट यांचा हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हिंदळे ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण देखील प्रा. अविनाश बापट यांचा हस्ते करण्यात आले.
हिंदळे भंडारवाडी शाळा, हिंदळे केंद्र शाळा, गिरावळ परबवाडी शाळा, प्रभूवाडी आणि भटवाडी अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी सरपंच मकरंद शिंदे, माजी सभापती सुनिलभाई पारकर, उपसरपंच रुपेश राणे, ग्रामपंचायत सदस्या दीप्ती खोत, प्रज्ञा राणे, महेश कोळबकर, सुभाष तेली, सारीका धुरी, नीलम हिंदळेकर, पोलीस पाटील संदीप हिंदळेकर, सोसायटी व्हा. चेरमन श्रीकृष्ण गिरकर, शिक्षक रमेश राठोड,अविनाश राणे, अमित खामकर, प्राप्ती राणे, भक्ती चव्हाण,मंगेश हिर्लेकर, शीतल मयेकर , योगेश बांदल, विजय भडके, तलाठी मेहंदळे, सत्यवान राणे, सुरेश हिंदळेकर अब्दुल गफूर आगा, तंटामुक्ती अध्यक्ष नाना राणे, मनोज जाधव, निलेश कुंभार, डॉ. रेश्मा मुजावर, दयानंद तेली, धोंडी हिंदळेकर, महेश परब आदींसह हिंदळे ग्रामस्थ व महिला आदी उपस्थित होते.