भोसले नॉलेज सिटीत प्रजासत्ताक दिन उत्साहात

Edited by:
Published on: January 27, 2025 15:12 PM
views 158  views

सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटी येथे देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून त्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ, सर्व प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  व विद्यार्थी उपस्थित होते.