सह्याद्रीत प्रजासत्ताक दिन उत्साहात

Edited by:
Published on: January 27, 2025 16:02 PM
views 237  views

सावर्डे : सह्याद्री क्रीडा संकुलावर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब भुवड यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजगीत, ध्वज प्रतिज्ञा व संविधान उद्देशिकेचे याप्रसंगी वाचन करण्यात आले. सावर्डे विद्यालयातील महाराष्ट्र छात्र सेना विद्यार्थ्यांनी ध्वजाला कवायतीच्या माध्यमातून सलामी दिली. विद्यालयाच्या वाद्यवृंद विभागाने देशभक्ती गीतांचे गायन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव महेशजी महाडिक, प्रकाशजी राजेशिर्के,युगंधराताई राजेशिर्के, उद्योजक प्रशांत निकम,संस्थेचे सर्व विश्वस्त, चिपळूणच्या माजी पंचायत समिती सभापती सौ. पूजाताई निकम, सह्याद्री किडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम , ऑस्ट्रेलियन कृषी तज्ञ ऑलिव्हर मर्चंड, सावर्डे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गमरे, पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड पोलीस बांधव,सावर्डे येथील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ,पालक,सह्याद्रीच्या विविध शाखेतील प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक  दादासाहेब पांढरे, प्रशांत सकपाळ अमृत कडगावे व रोहित गमरे यांनी केले.

तसेेच सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन  विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी सह्याद्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त व शालेय समितीचे समितीचे अध्यक्ष शांताराम खानविलकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात  आले.विद्यालयातील  विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन संस्थेच्या संचालक शांताराम खानविलकर, माजी मुख्याध्यापक अन्वर मोडक,, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर व प्रतिष्ठित नागरिकांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.