तळवडेत BSNL सेवा सुरळीत होण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 05, 2025 20:07 PM
views 471  views

देवगड : देवगड तालुक्यातील तळवडे BSNL सेवा सुरळीत होण्यासाठी तळवडे ग्रामस्थांच्यावतीने तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे तसेच दूरसंचार विभागाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. देवगड तालुक्यातील तळवडे येथील बीएसएनल सेवेचा बोजवारा उडाला असून त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.

देवगड तळवडे येथील BSNLच्या नेटवर्क बाबत ग्रामस्थ सध्या नाराजी व्यक्त करत आहेत.सध्या ५ जी सीम कार्ड अथवा स्मार्ट फोन धारकच BSNLसेवेचा लाभ घेऊ शकत आहेत.या गावातील शेतकरी वर्ग तसेच बहुतांश नागरिक साधा फोन वापरत असल्यामुळे या गावात BSNLव्यतिरिक्त जनसंपर्कसाठी दुसरी कोणतीही साधना नसल्याने तळवडे तळेबाजार या ठिकाणी दूरसंचारच्या टॉवरमध्ये होणारी तांत्रिक अडचण BSNL सिम धारकांसाठी त्रासदायक व गैरसोयीचे ठरत आहे.

गेल्या महिनाभरापासून आमच्या गावातील BSNL या दूरध्वनी सेवेला आम्हाला नेटवर्क मिळत नाही आहे.आम्हाला आमच्या कामानिमित्त  किंवा परगावी असलेल्या मुलांशी नातेवाईकां शी संपर्क साधता येत नसून bsnl सेवा लवकरात लवकर सु स्थितीत सुरू करावी या आशयाचे निवेदन यावेळी तळवडे ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.यावेळी तळवडे ग्रामस्थ उपस्थित होते.

तळवडे तळेबाजार येथील गेले काही दिवस टॉवरची तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास दूरसंचार विभागाला अपयश आलेले आहे.त्यामुळे ग्राहक वर्गातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

यामुळे दूरसंचारच्या या कारभाराबाबत ग्रामस्थान कडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून लवकरात लवकर bsnl सेवा सुरळीत करण्यात यावी अशा मागणी चे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.