मालवण नगरपरिषदच्या नादुरुस्त घनकचरा मशीन - बायो टॉयलेटची स्वखर्चातून दुरुस्ती

आमदार निलेश राणे यांची कार्यतत्परता
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 16, 2025 12:40 PM
views 226  views

मालवण : मालवण नगरपरिषदच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायो टॉयलेटची स्वखर्चातून दुरुस्ती आमदार निलेश राणे यांनी करून देत सेवेत उपलब्ध करून दिल्या आहेत. आमदार निलेश राणे यांच्या कार्यतत्परतेची अनुभूती मालवण नगरपरिषद प्रशासना सोबत मालवण वासियांनी पुन्हा एकदा अनुभवली आहे. 

दिवसाला पाचशे किलो ओल्या कचरा पासून कंपोस्ट खत निर्मिती करणाऱ्या दोन घनकचरा मशीन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काही वर्षे पूर्वी मालवण नगरपरिषदच्या माध्यमातून सेवेत होत्या. यातून होणाऱ्या खत निर्मितीला हरित ब्रँड प्राप्त झाला. मात्र त्या मशीन नादुरुस्त झाल्याने पडून होत्या. मालवण नगरपरिषदचा आढावा घेत असताना याबाबत माहिती आमदार निलेश राणे यांना मिळाली. तशी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी मशीन बंद अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. दुरुस्तीसाठी नसलेली निधीची तरतूद व अन्य काही समस्या लक्षात घेता यां मशीन स्वखर्चाने दुरुस्ती करण्याचा निर्णय आ. राणे यांनी घेतला. आणि तज्ञ एजन्सी कडून दुरुस्ती करून अगदी नव्या स्वरूपात दोन्ही कंपोस्ट मशीन नगरपरिषद सेवेत उपलब्ध करून दिल्या. आडारी घनकचरा व्यवस्थापन केंद्र येथे खत निर्मिती केली जाणार आहे. 

यासोबत मालवण शहरात मोठया संख्येने येणारे पर्यटक तसेच नागरिकांसाठी काही ठिकाणी बायोटॉयलेट आवश्यक होते. पालिकेकडील दोन बायोटॉयलेट नादुरुस्त झाले मात्र दुरुस्ती रखडली होती. दोन्ही बायोटॉयलेट अगदी नव्या स्वरूपात दुरुस्ती करून देत नगरपरिषदला सुपूर्द करण्यात आले. मालवण नगरपरिषद पार्किंग ठिकाणी शनिवारी रात्री घनकचरा मशीन व बायोटॉयलेट नगरपरिषद प्रशासनाकडे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.

स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक अशी बंदर जेटी, मालवण शहर बनवण्याचे आश्वासन दिले आहे. त्या आश्वासनाच्या पूर्तता दिशेने वाटचाल सुरु आहे. असे आमदार निलेश राणे यांनी यां निमित्ताने सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा शहरध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, ललित चव्हाण, मंदार लुडबे, निलम शिंदे, अंजना सामंत, महानंदा खानोलकर, पुजा वेरलकर, बाळू नाटेकर, ऋत्विक सामंत, सोनाली पाटकर, ऋषिकेश सामंत, दादा वाघ, भाऊ मोरजे यांसह शिवसेना भाजपा पदाधिकारी तसेच मालवण नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  

समस्या दाखवणारे अनेकजण असतात मात्र समस्या सोडवणारे कमीच असतात. तुम्ही समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले. स्वखर्चाने अनेक गोष्टी दिल्या. शासनस्तरावरून मोठा विकासनिधी आणण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नाशील आहात. गतिमान विकासाचे पालकत्व घेऊन आपण सेवाकार्य करतं आहात. प्रशासनाला गती देऊन पळवले. आमचा हुरूप वाढला आहे. अश्या भावना नगरपरिषद अधिकारी यांनी मांडल्या. तसेच आमदार निलेश राणे यांचे आभारही मानले.