उत्कृष्ट क्रीडापटू उत्तम सुभेदार यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 13, 2026 14:54 PM
views 166  views

सावंतवाडी : शहरातील चितारआळी येथील रहिवासी उत्तम रमाकांत सुभेदार (वय ५८ ) यांचे काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झेले. कळसुलकर हायस्कूलचे एक आदर्श उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून त्यांची शहरात ओळख होती.

शालेय स्पर्धेच्या कबड्डी, खोखो खेळाची मैदान त्यांनी गाजवली आहेत, तसेच ते शहरातील क्रिकेट मधील एक उत्कृष्ट विकेटकिपर म्हणजे चित्याची चपळाई असलेले म्हणून शहरात ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने सावंतवाडी सह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.