
गुहागर : गुहागर विजापूर महामार्गावर मोडका आगर येथे धरण पुलाच्या आधी एक झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाचे कर्मचारी येण्यापूर्वीच तेथे आलेल्या वाहनांचे चालक, एसटी ड्रायव्हर कंडक्टर आणि स्थानिकांच्या मदतीने हे झाड बाजूला करण्यात आले. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.