स्व. जिजाबाई सावंत यांच्या आठवणींना उजाळा

Edited by: विनायक गांवस
Published on: May 06, 2025 14:48 PM
views 143  views

सावंतवाडी : भालावल येथील स्व. जिजाबाई तुकाराम सावंत यांचा १२ वा स्मृतिदिन  विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व. जिजाबाई सावंत स्मारक येथे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

          

स्व. जिजाबाई सावंत या सेवाभावी व परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून भालावल परिसरात परिचित होत्या. यावेळी भालावल सरपंच समीर परब, माजी सरपंच तथा देवस्थान मानकरी रमेश परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष अशोक परब, अंकुश गावडे सामाजिक कार्यकर्ते उदय परब, रामचंद्र परब आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व. जिजाबाई सावंत स्मारक येथे त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच या स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

      यानिमित्त सकाळी स्व. जिजाबाई सावंत स्मारक येथे पुजा, अभिषेक, गणपती पुजन त्यानंतर बाळू काळे, राज काळे आदी ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात होम हवन, तरपण आदी धार्मिक विधी झाले. दुपारी महाप्रसाद, संध्याकाळपासुन रात्री पर्यंत भजन, किर्तन आदी कार्यक्रम झाले. यावेळी स्व. जिजाबाई सावंत यांचे सुपुत्र शिवा सावंत, भदू (आबा) सावंत, रमेश सावंत, डॉ सुभाष सावंत, मंगेश सावंत आणि सावंत कुटुंबीय उपस्थित होते.