संगीत परिक्षेत श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

Edited by: विनायक गावस
Published on: June 29, 2023 18:23 PM
views 146  views

सावंतवाडी : अ.भा. गांधर्व महाविद्यालयाच्या एप्रिल २०२३ च्या संगीत परिक्षेत सौ. वीणा दळवी संचलित  'श्री राधाकृष्ण संगीत साधना'च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रारंभिक परिक्षेत वेदा राऊळ हार्मोनिअम -विशेष योग्यता, गायत्री पांढरे  हार्मोनिअम -प्रथम श्रेणी, अवधूत चितारी गायन-प्रथम श्रेणी, नीधी सावंत गायन-प्रथम श्रेणी, आर्या राऊळ गायन-प्रथम श्रेणी, र्हिदान परब गायन-प्रथम श्रेणी,अमित मुळीक गायन-प्रथम श्रेणी प्राप्त केली.

प्रवेशिका प्रथम परिक्षेत दिक्षा काकतकर हार्मोनिअम -विशेष योग्यता, आर्या आजगांवकर हार्मोनिअम  -विशेष योग्यता, ईशा धुरी, गायन -विशेष योग्यता, यशश्री रेगे,गायन -प्रथम श्रेणी, कनक काळोजी, गायन -प्रथम श्रेणी, नमिता शेणई गायन -प्रथम श्रेणी तर प्रवेशिका पूर्ण परीक्षेत सोहम साळगांवकर हार्मोनिअम -प्रथम श्रेणी, प्रतिक्षा आरोलकर गायन -प्रथम श्रेणी, सानिका मेस्त्री गायन- प्रथम श्रेणी, गरिमा काजरेकर  गायन-द्वितीय श्रेणी, मिनाक्षी गोसावी गायन -द्वितीय श्रेणी,

मध्यमा प्रथम परिक्षेत गौरी पारकर गायन-प्रथम श्रेणी, योगिता पवार गायन - द्वितीय श्रेणी, सीमा सावंत गायन- द्वितीय श्रेणी प्राप्त केली.

मध्यमा पूर्ण परीक्षेत तेजल गावडे हार्मोनिअम -प्रथम श्रेणी, ममता प्रभू   हार्मोनिअम -प्रथम श्रेणी, वैष्णवी प्रभू, हार्मोनिअम -प्रथम श्रेणी,अनुष्का रायशिरोडकर गायन -प्रथम श्रेणी प्राप्त केली.

सर्व विद्यार्थ्यांना 'श्री राधाकृष्ण संगीत साधना'च्या संचालिका सौ. वीणा दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.